LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

युपीतील 11 चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या 

बेळगाव : बसमध्ये रेटारेटी करून प्रवाशांच्या बॅगा व दागिने चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील 11 चोरट्यांच्या मुसक्या कागवाड आणि अथणी पोलिसांनी आवळल्या आहेत.

सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे कागवाड व अथणी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या टोळीला जेरबंद केले. या प्रकरणात कागवाड येथे चार, चिक्कोडी येथे एक आणि अथणी येथे एक अशा एकूण सहा चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
अटक करण्यात आलेले चोरटे बसमधून प्रवास करणाऱ्या चांगले व महागडे कपडे परिधान केलेल्या प्रवाशांना लक्ष्य करत होते. कागवाड, अथणी आणि चिक्कोडी परिसरात बॅग चोरी करणाऱ्या या टोळीकडून पोलिसांनी सुमारे 225 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी येत्या काळात बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा विचार करण्यात येत असून, साध्या वेशातील पोलिस कर्मचारीही प्रवाशांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवतील, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली आहे.
तसेच, विशेषतः महिला प्रवाशांनी बसप्रवासादरम्यान आणि बसस्थानकांवर आपल्या बॅगा व दागिन्यांची अधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही पोलिस अधीक्षकांनी केले आहे.

 #thievesarrested
#athanikagwadinfo

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
' ही कोल्हेकुई वेळीच थांबवा अन्यथा .....'  : येळ्ळूर म.ए. समितीने दिला ईशारा' त्या ' अपघातातील जखमीचे निधनसतीश जारकीहोळी म्हणाले, '  महाराष्ट्रातून कर्नाटकाला पाणी सोडणे सध्या तरी कठीण 'युपीतील 11 चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या मंत्री सतीश जारकीहोळी यांची लोकअदालत : ऐकल्या लोकांच्या तक्रारीसर्टिफिकेट घोटाळा : दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखलबेळगाव डीसी कार्यालयाच्या नूतनीकरण कामांची मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली पाहणीयंदापासूनच सुरू करणार महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका : डी.के. शिवकुमार यांनी केली घोषणाबी. के. हरिप्रसाद यांनी स्वीकारली केपीसीसी अध्यक्षपदाची सूत्रे  एपीएमसीमध्ये अज्ञाताने गळफास घेऊन संपविले  जीवन