LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

रिल्स बनविणाऱ्या अतिउत्साही तरुणांनो सावधान ... बेळगाव जिल्हा अधीक्षकांनी दिलाय इशारा ...!

बेळगाव : रिल्स बनविणाऱ्या अतिउत्साही तरुणांनो सावधान ...! रिल्स बनविताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. नाहीतर कायद्याच्या कचाट्यात अडकाल. बेळगाव जिल्हापोलीस प्रमुखांनीही तसा सल्ला वजा ईशारा दिलाय.


अलीकडे 'बिग बॉस' स्पर्धक विनय आणि रजत यांनी तलवार (लांग) हातात घेऊन रील्स बनविल्या. यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. नंतर त्यांना जामिनावर स्वतःची सुटका करून घ्यावी लागली.



अजमेरमध्येही एका तरुणीने हातात बनावट पिस्तुल घेऊन लेडी डॉन ची भूमिका वटविली. तिने हवेत गोळीबाराचा सिन शूट करून रील पोस्ट केली. हा रील प्रचंड व्हायरल झाला. पण या रील मुळे तिला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली.



बेळगावमध्ये काही तरुणांनी कोयता, तलवार आणि खेळण्यातील पिस्तूल घेऊन रील्स तयार करून स्वतःला कायद्याच्या कचाट्यात घातलं आहे.
कोयता, तलवार आणि पिस्तूल घेऊन रील्स तयार केलेल्या या तरुणांच्या रील्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या प्रकारावर प्रतिक्रिया देताना जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, काही तरुणांनी हातात कोयता आणि वरून खेळण्याच्या पिस्तूलसारखी वस्तू घेऊन व्हिडिओ शूट केला आहे. यापूर्वी अनेक वेळा अशा शस्त्रांच्या प्रदर्शनासंदर्भात सूचना दिल्या आहेत आणि जनजागृतीदेखील करण्यात आली आहे. असे असूनही शस्त्र घेऊन रील्स करणं समोर आल्यामुळे संबंधित तरुणांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



समाजमाध्यमांवर अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करणे कायद्याप्रमाणे गुन्हा असून, अशा 'रील्स'च्या नादात शस्त्र उचलून शिक्षेस पात्र होऊ नका, असा इशारा पोलीस अधीक्षक गुळेद यांनी दिला आहे.
यामुळे तरुणांनो रिल्स बनवताय ....तर सावधान ...स्वतःला अडचणीत आणणाऱ्या रिल्स ......नको रे बाबा ...!!

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल