LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेंगलोर अंडरवर्ल्डचा माजी डॉन कै. मुथप्पा रायच्या मुलावर गोळीबार !

रामनगर : बेंगलोर अंडरवर्ल्डवर ज्याने ह्यातीत अधिराज्य गाजवले, ज्याच्या नावे बेंगलोर गारद व्हायचे तो डेंजरस डॉन आणि जय कर्नाटक संघटनेचे संस्थापक कै. मुथप्पा राय यांच्या मुलावर गोळीबार करण्यात आला असून या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे.


मुथप्पा राय यांचा मुलगा रिक्की राय यांच्यावर रामनगर तालुक्यातील बिददी येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ रात्री गोळीबार झाला आहे. यामध्ये रिकीच्या हातावर आणि नाकावर गोळ्या लागून गंभीर जखमा झाल्या असून, त्यांला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करून अधिक उपचारांसाठी बंगळुरूला हलवण्यात आले आहे.


काल शुक्रवारी रात्री सुमारे 11.30 वाजता रिक्की राय आपल्या गनमन आणि चालकासोबत रामनगर तालुक्यातील बिददी येथून बंगळुरला चालले होते. घराच्या कंपाऊंडमधून कार बाहेर पडताच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार करून घटनास्थळावरून पलायन केले.


गोळीबारात कारचालक आणि गनमन यांनाही किरकोळ जखमा झाल्या असून रिकीच्या हातावर आणि नाकावर गोळ्या लागून गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर पोलीसांनी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी तपास सुरू केला आहे. रिक्की राय यांच्या घरातील सुरक्षा रक्षक आणि स्वयंपाक्यांची चौकशी केली जात असून, घटनास्थळी मोबाईल फोन व काही गोळ्या सापडल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


संयुक्त अरब अमिरातीने खून, खंडणी आणि स्फोटके आणि बेकायदेशीर रित्या बंदुक बाळगणे असे विविध गुन्हे ज्याच्या नावावर होते असा बेंगळूरचानामचीन डॉन नेट्टला मुथप्पा राय (आर), उर्फ मुथप्पा राय याचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. बेंगळूर अंडर वर्ल्ड वर ज्याने तीस वर्षे अधिराज गाजविणे तो मुथप्पा राय हा वाणिज्य शाखेचा पदवीधर होता त्याने विजया बँकेत सार्वजनिक क्षेत्रात अधिकारी म्हणून सेवा बजावली होती यानंतर तो बेंगलोर अंडर वर्ल्डमध्ये खेचला गेला आणि त्याने अल्पावधीतच गुन्हेगारी क्षेत्रात कमालीचा कळस गाठला. सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याच्या उद्देशाने अखेरच्या टप्प्यात त्याने जय कर्नाटक नावाची संघटना काढली. मात्र त्यानंतर त्याला कर्करोगाने पछाडले उपचाराचा उपयोग झाला नाही आणि कर्करोगाशी झुंज देत त्याने जगाचा निरोप घेतला. अशा खतरनाक डॉनने एकेकाळी बेंगळुर गुन्हेगारी वर्तुळात दहशत माजवली होती. त्या नेट्टला मुथप्पा राय (आर), उर्फ मुथप्पा राय यांच्या मुलावर झालेल्या गोळीबाराने एकच खळबळ उडाली आहे.
हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी जाळे फेकले असून लवकरच हल्लेखोरांना चतुर्भुज केले जाईल आणि गोळीबाराचा हेतू उघड होईल, असे सांगितले जात आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम