कारवार : भीषण अपघातात ऑटो रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला.राष्ट्रीय महामार्ग 66 वरील कारवार-गोवा मार्गावरील माजळी जवळ गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली.
प्रमोद पेडणेकर (वय 45 ) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
संध्याकाळी सुमारे 5 च्या दरम्यान तामिळनाडू नोंदणी असलेल्या मारुती ब्रेझा कार चालकाचा भरधाव कारवरील ताबा सुटला आणि कार समोरून येणाऱ्या ऑटो रिक्षाला धडकली. या जोरदार धडकेत ऑटो चालकाचा मृत्यू झाला.
अपघातानंतर ऑटोरिक्षाच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला तर मारुती ब्रेझा कार पलटी झाली.
#accident
#autodriverdied
#karwar