LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आणि त्यांनी स्वतःवर झाडून घेतली गोळी ...!

कर्करोगाने त्रस्त डॉक्टरने संपविले स्वतःचे जीवन ..!!

बेळगाव : रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरने स्वतःवर गोळी झाडून घेऊन जीव दिला. ही हृदयद्रावक घटना आज सकाळी गोडसेवाडी-मंडोळी रोड (बेळगाव) परिसरात घडली.
डॉ. दिनेश लक्ष्मण भटकळ असे स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचे नाव असून कर्करोगाने त्रस्त झाल्याने त्यांनी हे  टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.

79 वर्षीय डॉ. दिनेश लक्ष्मण भटकळ हे  मूळचे उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्यातील रहिवासी असून, अनेक वर्षे वैद्यकीय सेवा बजावल्यानंतर ते बेळगावमधील गोडसेवाडी-मंडोळी रोड येथे स्थायिक झाले होते. 

काही काळापासून ते गंभीर अशा कर्करोगाने त्रस्त होते.  यामुळे ते नैराश्याने ग्रासले होते. आज शुक्रवारी सकाळी त्यांनी आपल्या राहत्या बंगल्याच्या बाल्कनीत स्वतःवर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

डॉ. दिनेश भटकळ यांनी कर्करोगाने त्रस्त झाल्याने इतका टोकाचा निर्णय घेतला असे सांगण्यात येत असले तरी आत्महत्येमागील नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती