LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अज्ञातांनी मुलाला दिलं गुंगीचं इंजेक्शन ..! पण .….

कुंदगोळ : पालकांनो सावधान... आपल्या मुलांवर तुमचे लक्ष असुद्या... लहान मुलांना घरात एकटं सोडू नका....लहान मुलांना  खेळायला बाहेर पाठवत असाल तर त्यांच्यावर अधून मधून तुमची नजर असू द्या..
काय माहित कोण त्यांच्या मागावर असेल ? 
कुंदगोळ तालुक्यातील नेलगुड्ड गावात घडलेल्या या घटनेमुळे हे सारं काही सांगण्याचा प्रपंच .....!

कुंदगोळ तालुक्यातील नेलगुड्ड गावात घरात एकटा असलेल्या 10 वर्षीय मुलाला गुंगीचे इंजेक्शन देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येते. या खळबळजनक घटनेमुळे नेलगुड्ड गावात घबराट पसरली आहे.
 दहा वर्षांचा  मणिकांत गाणिगेर हा मुलगा घरी होता. याची कुणकुण लागलेल्या काही अनोळखी व्यक्ती मणिकांतच्या घरी आल्या आणि त्यांनी त्याच्या आई-वडिलांबद्दल विचारणा केली. घरात कोणी नसल्याचे लक्षात येताच त्यांनी मुलाला इंजेक्शन दिले. मात्र, कोणाचीतरी चाहूल1 लागल्याने त्यांनी तेथून पळ काढला असावा, असे बोलले जाते.  
इंजेक्शन दिल्यानंतर सुमारे अर्धा तास मुलगा बेशुद्ध अवस्थेत पडून होता. त्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला तातडीने कुंदगोळ तालुका रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील तपासणीसाठी त्याला हुबळी येथील केएमसीआरआय रुग्णालयात हलवले आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कुंदगोळ ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कंटेनर आणि मालवाहू ट्रक यांच्यात जोरदार धडक :  चालकाचा पाय तुटून वाहनात अडकलापंधरा दिवसात घरकुल वाटप न केल्यास आंदोलन :  माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी दिलाय ईशाराअज्ञातांनी मुलाला दिलं गुंगीचं इंजेक्शन ..! पण .….रविवार पेठेत कृषी केंद्राला लागली आग : भीषण आगीत 50 लाखांचा ऐवज झाला जळून खाकआमिषाचा बळी : बँक खात्यातून उडविले 99 हजार रुपये ...!गुरु-शिष्यातील नात्याचा भावस्पर्शी सोहळा : 33 वर्षानंतर मिळाला स्मृतींना उजाळाआणि त्यांनी स्वतःवर झाडून घेतली गोळी ...!6.70 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजनमहांतेश नगरमध्ये  मनपाकडून होतेय नव्या भाजी मार्केटची उभारणीरौडीशीटर विल्सन गार्डन नागा जामिनावर .!