LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' शिवम असोसिएट्स ' नंतर ' आदित्यराज कॅपिटल ' आले रडारवर ....!

आदित्यराज कॅपिटलची घेतली जातेय झाडाझडती ; ठेवीदारांची फसवणूक केल्याचा होतोय आरोप ..!

बेळगाव : आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या आर्थिक संस्थेची बेळगाव उपविभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती घेण्यात येत आहे.

ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप संस्थेवर असून त्याच अनुषंगाने आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड संस्थेच्या उलढालीची चाचपणी केली जात असल्याचे समजते.

बेळगावचे उपविभागीय अधिकारी (एसी) शरवण नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ' आदित्यराज ' ची तपासणी चालविली आहे.

शहरातील भाग्यनगर परिसरातील या संस्थेने कोणतीही पुरेशी सुरक्षा न देता जादा व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांकडून ठेवी गोळा केल्याचा आरोप आहे. तसेच जमा झालेला निधी अन्यत्र गुंतवण्यात आल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणी संस्थेविरोधात केपीआयडी आणि बड्स सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन विविध कागदपत्रांची तपासणी केली.

 संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची तसेच ठेवीदारांच्या पैशांच्या वापराची सखोल चौकशी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल