LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू

 कागवाड : कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.

कागवाड तालुक्यातील शेडबाळ-उगार राज्य महामार्गावर हा अपघात घडला.
तुळशीबाई शिवाजी चव्हाण (वय 70) असे अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.

 तुळशीबाई ह्या दुचाकीवरून चालल्या होत्या. कागवाड तालुक्यातील शेडबाळ-उगार राज्य महामार्गावर त्यांच्या दुचाकीला कारने ठोकरले. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आणि काही ठिकाणी वेळातच रक्तस्राव होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुचाकीवरील अन्य व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असून ती सुदैवाने बचावली.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच कागवाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
वकिलाला धमकाविणाऱ्या त्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबीत करा : वकील संघाने धाडले मुख्यमंत्र्यांना निवेदन मुख्यमंत्री बदलले तरी परिस्थिती जैसे थे राहिल : माजी मुख्यमंत्री शेट्टर यांनी मारला नेतृत्व बदलावर टोमणापंचकन्यांमध्ये अहिल्येला स्थान देणे, ही भारतीय संस्कृतीची महानता : डॉ. सच्चीदानंद शेवडेधुव्वाधार पाऊस : तवंदीत पाणीच पाणी : वाहनधारकांची उडाली तारांबळ6 जून रोजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये पदवीदान समारंभगुदमरून चिमुकल्याचा मृत्यूखासगीकरणाविरोधात हेस्कॉम कर्मचाऱ्यांचा एल्गार  ..!उद्या  बेळगावातील अनेक भागात केला जाणार वीजपुरवठा खंडितजिल्हा पोलीस प्रमुखांनी लोकांना केलंय आवाहन : म्हणाले, ' सावधान ..आमिषाला बळी पडू नका '  राहुल जारकीहोळी यांनी केला प्रदेशाध्यक्षांचा सत्कार