LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

काँग्रेस युवा नेत्यावर टोळक्याने केला जीवघेणा हल्ला ..!

काँग्रेस युवा नेत्यावर टोळक्याने केला जीवघेणा हल्ला ..!


उडुपी : दोन वाहनातून आलेल्या टोळक्याने धारधार शस्त्राने युवा काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला केला. उडुपी शहरातील पीपीसी क्रॉसजवळ ही घटना घडली.


एखाद्या चित्रपटाप्रमाणे टाटा सफारी आणि महिंद्रा थार ही दोन वाहने भरधाव वेगाने पीपीसी क्रॉसनजिक आली. त्या दोन्ही वाहनातून आलेल्या टोळक्यांने हातातील नंग्या तलवारी आणि इतर धारधार शस्त्रांनी एनएसयूआयचे उपाध्यक्ष शरथ कुंदर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शरथ जमिनीवर कोसळले. शस्त्रधारी टोळक्याने रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या शरथ यांना, ' वाचलास तर पुन्हा मारू ' अशी धमकी देऊन घटनास्थळावरून पोबारा केला.



या घटनेची पार्श्वभूमी अशी की, काही दिवसांपूर्वी एनएसयूआयचे उपाध्यक्ष शरथ कुंदर आणि दुसऱ्या तरुणांमध्ये मणिपाल हॉटेलमध्ये वाद झाला होता. काही दिवसानंतर, 'वाद विकोपाला नको, यासाठी चर्चा करून मार्ग काढू ' असे सांगून मांडवली करण्यासाठी शरथ कुंदर यांना उडुपी शहरातील पीपीसी क्रॉसजवळ बोलावण्यात आले. यामुळे शरथ चौकात आले होते. आणि हीच संधी साधून दोन वाहनातून आलेल्या 6 ते 7 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हा हल्ला केला, असे समजते.
या घटनेत शरथ कुंदर गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी उडुपी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम