LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता नदीवर

बैलहोंगल : मलप्रभा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. महेश मडिवाळप्पा गणाचारी ( रा. वक्कुंद, तालुका : बैलहोंगल ) असे नदी पात्रात बुडून मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे..

महेश हा शुक्रवारी दुपारी मित्रांसोबत बैलहोंगल तालुक्यातील वक्कुंद गावाजवळील मलप्रभा नदीत पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात मौजमजा करता करता नदीतील खोल पाण्यात गेल्याने तो बुडाला.

घटनेची माहिती मिळताच समाजसेवक मल्लिकार्जुन गणिगेर तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू केली. मात्र अंधार पडल्यामुळे शुक्रवारी रात्री शोधकार्य तात्पुरते स्थगित करण्यात आले.
शनिवारी सकाळी अग्निशमन दलाने पुन्हा शोधमोहीम हाती घेतली. अखेर नदीतून महेशचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
या दुर्दैवी घटनेमुळे गणाचारी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण वक्कुंद गावात शोककळा पसरली आहे. सीपीआय प्रमोद येलिगार व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
फ्रिजचा स्फोट होऊन हॉटेलला लागलेल्या आगीत झाले मोठे नुकसानमंत्रीपद न दिल्यास काँग्रेसविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा : रेड्डी समाज आक्रमकबालवीर विद्यानिकेतन शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता नदीवरविजेचा धक्का लागून रंगारी कामगाराचा मृत्यूअंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण निमित्त बीज संकलन उपक्रम नामदेव चौगुले म्हणाले, ' निसर्ग वाचवला तरच भविष्य सुरक्षित राहील ' : कुर्ली हायस्कूलमध्ये पर्यावरण दिन कार्यक्रममाजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधनखासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केली महाराष्ट्र-कर्नाटक महामार्गाच्या कामाची पाहणी : 2800 कोटी रुपये खर्चातून निर्माण केला जातोय सुमारे 572 किलोमीटर लांबीचा मार्ग' भाविप ' ने   केले होते ' सेवा व संस्कार ' यावर विशेष व्याख्यानाचे आयोजन : डॉ. जे. जी. नाईक, प्रा. अरुणा नाईक, स्वाती घोडेकर यांनी केले मार्गदर्शन