LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

चोरी करून विकलेले 4 लाखाचे मोबाईल केले मालकांना परत

निपाणी : आठवडी बाजार, यात्रा, जत्रा बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवला अथवा चोरीला गेला की तो पुन्हा मिळेल, अशी अपेक्षा अनेकजण सोडून देतात. मात्र निपाणी ग्रामीण पोलिसांनी केंद्र सरकारच्या 'सीई आयआर' पोर्टलच्या मदतीने तब्बल 4 लाख रुपये किमतीचे 21 हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गत वर्षांसह अलीकडील तीन महिन्यांत मोबाईल हरवल्याच्या आणि चोरीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारी गांभीर्याने घेत पोलिसांनी 'सीईआयआर' पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास सुरू केला. चोरीस गेलेले अनेक मोबाईल काही व्यक्तींनी कमी किमतीत खरेदी करून वापरत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवत विविध ठिकाणांहून हे मोबाईल जप्त केले. एकूण 21मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत सुमारे 4 लाख रुपये आहे. 
 उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्या हस्ते हे मोबाईल संबंधित मालकांना परत देण्यात आले. हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. या मोहिमेत उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, हवालदार आनंद कुंभार, महांतेश पाटील, रमेश शिलणवर, एम. एफ. नदाफ, मंजुनाथ खोत, रघू मेलगडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
---
जुना मोबाईल खरेदी करू नका :

मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास घाबरून न जाता त्वरित 'सीईआयआर' पोर्टलवर तक्रार नोंदवावी. तसेच जुना मोबाईल खरेदी करताना अधिकृत पावती, आयएमईआय क्रमांक आणि विक्रेत्याची माहिती तपासूनच व्यवहार करावा. यामुळे चोरीस गेलेले किंवा हरवलेले मोबाईल शोधणे अधिक सुलभ होणार असल्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांनी सांगितले.
-----

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती