LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कर्जाच्या वादातून युवकाचे अपहरण करून मारहाण ..?

news_1780651333_0_995.webp

 

बेळगाव : कर्जाच्या वादातून एका युवकाचे अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका माजी मंत्र्यांच्या साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी हा प्रताप केल्याचे  समजते. 

बंदेनवाज नामक इसमाने एका माजी मंत्र्यांच्या मालकीच्या साखर कारखान्याकडून ऊसतोडणीसाठी  4 लाख रुपयांचे आगाऊ कर्ज घेतले होते. मात्र, आगाऊ रक्कम घेतल्यानंतरही तो ऊसतोडणीचे काम करण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी 4 लाख रुपयांची वसुली करण्यासाठी त्याचा ट्रॅक्टर आणि टिपर जप्त करण्याचा इशारा दिला होता. इतके करूनही बंदेनवाज हा ईशारा वजा धमकीला भीक घालत नव्हता. यामुळे त्याला दम देण्यासाठी कारखान्यातील 20 हून अधिक कर्मचाऱ्यांनी बंदेनवाजच्या भावाला उचलून  एका निर्जन ठिकाणी नेऊन धोपटल्याचे बोलले जाते. रामदुर्ग शहरात घडली आहे. 

मात्र, बंदेनवाजचा भाऊ बाशा याचे रामदुर्ग शहरातून अपहरण आणि मारहाण या वृत्ताला अद्याप ठोस दुजोरा मिळालेला नाही.  पण, या भागातील टपरीवर घटनेबद्दल बारीक आवाजात कुजबुज कानी पडल्याचे सांगण्यात येते.news_1780651370_0_833.webp

 

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शहापूर पोलिसांनी केले 15 लाख 73 हजार 370 रुपये किमतीचे 103.97 ग्रॅम वजनाचे सोने जप्त समाजाच्या अगतिकेला आपण क्रौर्य ठरवणार काय? : डॉ.शेवडे यांचा सवालजनआक्रोशाला घाबरून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलले : पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर शाब्दिक हल्लाबोल' मला दुःख झाले नाही आणि विशेष आनंदही झालेला नाही : खातेवाटपाबद्दल सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया‘लोटस बसदी ’च्या धर्तीवर नवीन टर्मिनलमंत्रिमंडळात एच.के. पाटील, रामलिंगा रेड्डी यांच्यावर अन्याय :  बेळगाव रेड्डी संघाचा संताप, तीव्र आंदोलनाचा इशाराबालिका आदर्श विद्यालयाच्या एनसीसी ग्रुपच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा : विविध प्रकारच्या रोपांची करण्यात आली लागवडडॉ. संतोष जयगौडर म्हणाले, ' पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज ' ...!! आरपीडी कॉलेजमध्ये साजरा झाला जागतिक पर्यावरण दिनराहुल गांधींनी घेतली कठोर भूमिका: म्हणाले, ' रामलिंगा रेड्डी यांची समजूत काढा. नाही मानलं तर राजीनामा स्वीकारा पत्नीवर घातला कुऱ्हाडीने घाव :  न्यायालयाने पतीला ठोठावली 5 वर्षांची शिक्षा