LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन

बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शनिवारी आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीनंतर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 2026 च्या खरीप हंगामासाठीच्या कर्नाटक शेतकरी सुरक्षा प्रधानमंत्री पीकविमा योजना संदर्भातील माहितीपत्रकाचे प्रकाशन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हे माहितीपत्रक तयार करण्यात आले आहे. यामध्ये योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधा, नोंदणी प्रक्रिया, विमा हप्ता, पीक नुकसानीची भरपाई तसेच इतर महत्त्वाची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपल्या पिकांचा विमा उतरवून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळवावे, असे आवाहन केले.
या प्रसंगी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, पोलीस आयुक्त भोरसे गुलाबराव भूषण, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
राज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद