LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

भडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद 

बेळगाव : महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज नजीकच्या भडगावजवळ मुसळधार पावसामुळे पर्यायी पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. मात्र, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत आजरा मार्गे वाहतूक पुन्हा सुरू केली आहे.

दरम्यान, गडहिंग्लज आणि आजरा परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नद्या व ओढे दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे गडहिंग्लज-नेसरी मार्गावर पाणी साचल्याने या रस्त्यावरील वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

संबंधित विभागांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा तसेच पावसाळी परिस्थितीत आवश्यक ती खबरदारी घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
राज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद