LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

पोहण्यासाठी गेलेल्या तिघा लहान मुलांचा बुडून मृत्यू

धारवाड : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
अन्वर इब्राहिम वटणाळ (वय 13), सुभानी इसाक बागजीकोप्प (वय 12) आणि मेहबूब सुभानी दादापीर वटनाळ (वय 15) अशी पाण्यात बुडून मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत.

 धारवाड तालुक्यातील सिंगनहळ्ळी गावाजवळील करेम्मा तलावात शनिवारी ही घटना घडली आहे.

 मेहबूब आणि अन्वर हे सख्खे भाऊ असून ते सिंगनहळ्ळी गावचे रहिवासी होते. तर सुभानी हा बैलहोंगल तालुक्यातील रहिवासी असून उन्हाळी सुट्टी घालविण्यासाठी तो नातेवाईकांकडे आला होता.
उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने तिघेही मित्र दुपारच्या सुमारास करेम्मा तलावात पोहण्यासाठी गेले होते. पाण्यात मौज करताना त्यांना तलावातील पाण्याच्या खोलीचा आला नाही आणि पाण्यात बुडताना एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघेही पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सायंकाळपर्यंत मुले घरी परतली नसल्याने चिंताग्रस्त पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी ही दुर्घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या प्रकरणी गरग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

#3boysdied
#drowninpond 
#dharwad

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती