LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

थांबलेल्या ट्रकला आदळली कार : भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू

हावेरी : थांबलेल्या ट्रकला भरधाव कारने धडक दिली. या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोघे जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर ब्याडगी तालुक्यातील मोटेबेन्नूर गावाजवळ आज गुरुवारी सकाळी हा अपघात झाला.


राणेबेन्नूर येथील सिद्धेश्वर नगर आणि हरिहरसह गोव्यात राहणारे फरान (27), उम्मिशिपा (16), अलिशा (20), फुलखान (17) आणि फिरोज (42) यासह अन्य एकजण या अपघातात मरण पावला आहे. तस्लिन आणि महक असे दोघेजण अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर हावेरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हे सर्वजण कुटुंबीयांसह सुट्टीनिमित्त आड्डी गार्डन पार्कला जात होते. तिथून पुढे गोव्यात जाण्याचा त्यांचा बेत होता. याआधी त्यांनी राणेबेन्नूर येथील फिरोज यांच्या घरी कार्यक्रमाला हजेरी लावली.तेथून हे सर्वजण सहलीसाठी रवाना झाले होते. मात्र, ब्याडगी तालुक्यातील मोटेबेन्नूर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर थांबलेल्या ट्रकचा कार चालकाला अंदाज आला नाही. भरधाव कार ट्रकला आदळली आणि अनर्थ घडला.


घटनेनंतर ब्याडगी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह हावेरी जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आले आहेत. एका जखमीची प्रकृती चिंताजनक आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम