LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू : दोघे मित्र जखमी 

बेळगाव : भरधाव वेगाने चाललेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारील वाहनाला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. नंदीहळ्ळीनजिक हा अपघात घडला आहे. 
 
बसवराज सोमलिंग बानी असे अपघातात मरण पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून या अपघातात त्या दुचाकीच्या मागील आसनावर बसलेले विनायक कंबी आणि विलास देवजी हे बसवराजचे दोघे मित्र जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. 

बसवराज हा उद्यमबागला कामाला होता. के. के. कोप्प ते उद्यमबाग असा त्याचा दुचाकीवरून रोजचा प्रवास होता. यामुळे उद्यमबाग ते नंदीहळ्ळी मार्गे के. के. कोप्प हा रस्ता त्याच्या रोजच्या परिचयाचा होता. नेहमीप्रमाणे तो राजहंस गड-नंदीहळ्ळीमार्गे के. के. कोप्प ला चालला होता. त्याच्यासोबत विनायक कंबी आणि विलास देवजी हे त्याचे मित्र गादीवर होते. हे तिघे बेळगावहून नंदीहळ्ळी मार्गे के. के. कोप्पला जात असताना राजहंसगड नंदीहळ्ळी मार्गावरील उतारावर दुचाकी चालवणाऱ्या बसवराजचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगाने जाणारी दुचाकी रस्त्याशेजारील झाडाला जाऊन आदळली. यामध्ये बसवराज बानी हा 27 वर्षीय तरुण जागीच ठार झाला तर त्याचे दोघे मित्र जखमी झाले..

धोकादायक वळणावर आणि वेग जास्त असल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे..
ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील चौकशी केली जात आहे.
नंदीहळ्ळीचा उतार हा आधीपासूनच धोकादायक म्हणून ओळखला जातो. अशा ठिकाणी बेफाम वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालविणे जीवघेणे ठरू शकते. यासाठी या वळणी मार्गावर वाहन सावकाश चालविणे शहाणपणाचे असल्याचे लोकांतून बोलले जात होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल