अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील झुंजरवाडा गावात मेंढ्या राखत असताना एका तरुणावर मगरीने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.
सुनील मलाप्पा गोसराळा (शिरट्टी) (वय 28) हे झुंजरवाडा येथील मेंढी लोकर विकास महामंडळाच्या मागील बाजूस मेंढ्या राखत होते. त्यावेळी हात धुण्यासाठी ते पाण्याजवळ गेले असता अचानक मगरीने त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात सुनील यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना मगरीच्या तावडीतून वाचवले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत जखमी सुनील यांच्या प्रकृतीची चौकशी केली.