LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शालेय विद्यार्थ्याने घेतला गळफास  ?  : पालकांनी व्यक्त केलाय घातपाताचा संशय : केलीय चौकशीची मागणी

धारवाड : खाजगी शाळेच्या वसतीगृहात राहणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गळफासाने त्याचा मृत्यू झाला असून हा घातपाताचाच प्रकार असून त्याची सखोल चौकशी व्हावी, असे त्या मुलाच्या पालकांनी म्हटले आहे.

प्रीतम कंपली असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून तो बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हिरेऊळ्ळिगेरी गावचा रहिवासी होता.
शिक्षणासाठी तो धारवाड येथील खाजगी इंग्रजी शाळेच्या वसतीगृहात राहत होता.

माहितीनुसार, रविवारी संध्याकाळपर्यंत तो रोजच्या प्रमाणे वावरत होता. त्याने दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरून आपल्या पालकांशीही संवाद साधला होता. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्याने वसतीगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  बातमी त्याच्या पालकांना मिळाली.  
घटनेची माहिती मिळताच प्रीतमचे पालक तातडीने धारवाडला पोहोचले. त्यांनी आपल्या मुलाने आत्महत्या केली नसल्याचा संशय व्यक्त केला आहे. “संध्याकाळी मोबाईलवर आमच्याशी बोललेला मुलगा अचानक आत्महत्या करेल, यावर आमचा विश्वास नाही. या प्रकरणामागे अन्य कोणाचा तरी हात असू शकतो. हा घातपाताचाच प्रकार असून पोलिसांनी सखोल चौकशी करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

ही घटना धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी धारवाड जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती