LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

52 गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं राज्य सरकार घेणार मागे ...!

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींचा सरकारवर शाब्दिक हल्लाबोल

हुबळी : कर्नाटक राज्य सरकारने 52 गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी चांगलेच तापले असून त्यांनी सरकारवर तुष्टीकरणाचे धोरण राबवत असल्याचा आरोप करीत शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
राज्य सरकारने 52 गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे मागे घेण्याच्या निर्णयावर प्रल्हाद जोशी यांनी तीव्र टीका केली आहे.

आज शनिवारी हुबळीत प्रसार माध्यमांशी बोलताना प्रल्हाद जोशी यांनी,  “ राज्यातील गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत निषेधार्ह आहे. राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना पाठिंबा देण्याचा हा प्रकार आहे., असे म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार असे ‘तुष्टीकरणाचे’ धोरण राबवत आहे, जे राज्याच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. सरकारने तत्काळ हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आम्ही याविरोधात कायदेशीर मार्गाने लढा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
या निर्णयामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि जनतेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचेही प्रल्हाद जोशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

#BJPMinister 
#PralhadJoshi 
#againststategovt 
#pressconference 
#hublinews

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी बेळगाव महापालिकेतील 58 नगरसेवकांच्या मालमत्तेची पडताळणी अतिक्रमण हटाव मोहिमेला आलाय वेगघुसखोरीच्या संशयावरून बेळगाव पोलिसांकडून करण्यात आली 20 जणांची चौकशी ..!वेदगंगा आटल्याने पाणीप्रश्न गंभीर :  शहरवासीयांची पाण्यासाठी होतेय धावाधाव खानापुरात उद्या रंगणार आंतरराष्ट्रीय दंगल ..!इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट होऊन लागली दुकानाला आग : सुमारे लाख-दीड लाख रुपयांचे झाले नुकसान सहकारी पतसंस्थांच्या कार्यात लोकविश्वास महत्त्वाचा : युवराज हुलजी यांचे प्रतिपादन 52 गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं राज्य सरकार घेणार मागे ...!टायर फुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलरच कलंडली : अपघातात तान्हुल्यासह 12 जण जखमी