LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

येळ्ळूरवासीयांनी दिली अर्जुन गोरल यांना शब्दसुमनांजली

गावाला योग्य दिशा देण्याचे काम गोरल यांनी केले : शोकसभेत मान्यवरांनी दिला अर्जुन गोरल यांच्या स्मृतींना उजाळा

बेळगाव : सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात महाराष्ट्र एकीकरण समितीचे येळ्ळूर येथील  ज्येष्ठ नेते अर्जुन गोरल यांना आदरांजली वाहण्यात आली.
येळळूर, चांगळेश्वरी मंदिर येथे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत मान्यवरांनी त्यांच्या स्मृतीस उजाळा देताना त्यांच्या निधनामुळे सीमाभागातील चळवळीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे उपस्थितांनी श्रद्धांजलीपर भाषणात म्हटले. 
अर्जुन गोरल हे कडक शिस्तीचे आणि स्पष्टवक्ते नेते होते.
त्यांनी नेहमी येळळूर गावाला योग्य दिशा देण्याचे काम केले. समाजासाठी लढणारा एक लढाऊ नेता गमावल्यामुळे गावाची अपरिमीत हानी झाली आहे, अशा भावना शोकसभेत व्यक्त करण्यात आल्या. सीमाप्रश्नाचा निकाल लागेपर्यंत सर्वांनी एकजुटीने लढण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

शोकसभेच्या अध्यक्षस्थानी वामनराव पाटील होते. सभेच्या सुरुवातीला वामनराव पाटील आणि माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील यांनी दिवंगत अर्जुन गोरल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यानंतर प्रकाश अष्टेकर यांनी प्रास्ताविक केले.
शोकसभेत दत्ता उघाडे, सी. एम. गोरल, बबन कानशिडे, किरण अण्णा पाटील, डी. जी. पाटील, आनंद पाटील, पी. ए. पाटील, दुद्दाप्पा बागेवाडी, प्रकाश तोपिनकट्टी, धाकलू करविनकोप, उदय जाधव, माजी जिल्हा पंचायत सदस्य दिलीप कांबळे आणि परशराम मोटराचे आदींनी आपले विचार मांडले. 

या शोकसभेला सतीश देसुरकर, सुरज गोरल, दयानंद उघाडे, दामू अण्णा परीट, कृष्णा शहापूरकर, नागेश बोबाटे, शिवाजी कदम, शिवाजी गोरल, अजित गोरल, प्रकाश मालुचे, रमेश मेणसे, डॉ. विकास मेणसे, अशोक चौगुले, अनिल पाटील, नेताजी गोरल, राकेश परीट, रमेश पाटील, सी. बी. पाटील, अनंत पाटील, दौलत पाटील, बाळू धामणेकर, कृष्णा बिजगरकर, लक्ष्मी मासेकर, सुवर्णा बिजगरकर, रूपा पुन्यान्नावर, अनुसया परीट, जोतिबा उडकेकर, तुकाराम टक्केकर, रामदास धुळजी, परशराम घाडी, मारुती तुळजाई, मधू कुगजी, रणजित गोरत, गणपती हट्टीकर, रामा पाखरे, बाळू पाटील, प्रकाश पाटील, रमेश धामनेकर, वसंत पाटील, भरत मासेकर, सी. एस. पाटील, गजानन पाटील, रघुनाथ मुरकुटे, परशराम कंग्राळकर, यल्लाप्पा पाटील, प्रकाश गोरल, सचिन दळवी (मंडोळी) आणि मोरे (सावगाव) यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

news_1779712022_0_663.webp

 

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल