LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बालवीर विद्यानिकेतनमध्ये योगा तासांना सुरुवात

बेळगाव : बेळगुंदी ( तालुका-बेळगाव) येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराला 11 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे .
आज दिनांक 15 एप्रिल पासून योग विद्याधाम संस्था मराठा मंदिर, बेळगाव यांच्यावतीने योगा तासांचे उद्घाटन बालवीर सोशल फौंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांच्या शुभहस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून करण्यात आले.




योग विद्याधाम संस्था मराठा मंदिर बेळगाव यांच्या वतीने सकाळी 7:00 ते 8:00 या वेळेत योगाचे तास घेतले जाणार आहेत .यासाठी अच्युत्य माऊली, सचिन पाटील, गिरीश तेंडुलकर, सुनील चौगुले, श्रीकांत प्रभू अशी पाच योग गुरूंचे पथक योगाचे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते . हे शिबिर पंधरा दिवस चालणार असून या शिबिरामध्ये योगा, पोहणे, धावणे यासह मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, कन्नड, समाज या विषयांचे सुद्धा मार्गदर्शन होणार आहे .या संपूर्ण शिबिराचे आयोजन अध्यक्ष मा. श्री प्रेमानंद गुरव आणि डी. डी. बेळगावकर यांच्या सहकार्यातून होत आहे .



या उद्घाटन समारंभ प्रसंगी बालवीर विद्यानिकेतनचे संयोजक शंकर चौगुले , दशरथ पाऊसकर, राजू मुजावर व शंभरहून अधिक शिबिर प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, भाग्यश्री कदम, क्रीडा शिक्षक गोविंद गावडे, सिद्धेश्वर तुर्केवाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा शहापूरकर यांनी केले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल