LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योगा दिन उत्साहात साजरा

निपाणी: निपाणी येथील कोडणी रस्त्यावरील अंकुरम इंग्लिश मीडियम शाळेतील पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचा जागतिक योग दिन शनिवारी (ता.२०)  पार पाडला.
यावेळी संस्थेचे संचालक नारायण चौगुले, संचालिका नम्रता चौगुले, सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले, प्राचार्या चेतना चौगुले त्यांची प्रमुख उपस्थिती होती. 
नारायण चौगुले यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिकरित्या निरोगी राहण्यासाठी रोज योगा व व्यायाम नियमित करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. त्याशिवाय योगा व त्याचे आध्यात्मिक महत्त्व, शास्त्रीय महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देऊन त्याचे आपल्या आयुष्यातील महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी योग्य आणि पौष्टिक आहाराची सवय लावून घ्यावी व बाहेरील तयार अन्नपदार्थ खाण्याचे शक्यतो टाळावे याबद्दलही सविस्तर मार्गदर्शन केले.
संस्थेचे संचालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्राणायाम, सूर्यनमस्कार, गरुडासन, पवन मुक्तासन, नौकासन  मर्कटासन भुजंगासन, वृक्षासन, सिंहासन अशी वेगवेगळी आसणे केली. तसेच योगा दिन व जागतिक पितृ दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांसोबत योगा करण्याचा आनंद या क्षणी अनुभवला. त्यामुळे या क्षणी सर्व विद्यार्थ्यांच्या वडिलांनी आपली उपस्थिती दर्शवून आपल्या पाल्यासोबत जागतिक पितृ दिन व योगा दिन एकत्रित साजरा केला. आराध्या खोत हिने सूत्रसंचालन केले. आराध्या कोळकी हिने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सौरभ कांबळे यांनी योग दिनाची प्रतिज्ञा करून घेतली यावेळी संस्थेचे पदाधिकारी, संचालक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. 
---

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती