LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन : दिग्गज मान्यवरांची राहणार उपस्थिती

बेळगाव: जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि बेळगाव जिल्हा आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन रविवार, 21 जून रोजी सकाळी 6 वाजता बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी कार्यक्रमाचे उद्घाटन करणार असून, बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यू. टी. खादेर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सरकारी मुख्य सचेतक अशोक पट्टन, नवी दिल्लीतील कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, वायव्य कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरमगौडा कागे, कर्नाटक राज्य वित्त महामंडळाचे अध्यक्ष महानतेश कौजलगी तसेच कर्नाटक उप्पार विकास महामंडळाचे अध्यक्ष भरमाण्णा उप्पार हे विशेष आमंत्रित म्हणून सहभागी होणार आहेत.
राज्यसभा सदस्य ईराण्णा कडाडी, चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका जारकीहोळी, बेळगाव लोकसभा खासदार जगदिश शेटर आणि उत्तर कन्नड लोकसभा खासदार विश्वेशवर हेगडे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी या योग दिन कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन : दिग्गज मान्यवरांची राहणार उपस्थितीबेळगाव जिल्हा माजी सैनिक महासंघाची त्रैमासिक बैठक उद्याबी. के. हरिप्रसाद यांचा केपीसीसी अध्यक्षपदाचा शपथविधी 21 जून रोजी ; तयारीची पाहणी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केलीशाळा, अंगणवाडी व वसतिगृहांना अधिकाऱ्यांनी नियमित भेटी द्याव्यात : जि.पं. सीईओ राहुल शिंदेकोक्कनूर शाळेच्या मुख्याध्यापक आत्महत्या प्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा दाखलकृष्णा नदीसाठी 2 टीएमसी पाणी सोडण्याबाबत डी. के. शिवकुमार यांची महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांसोबत बैठकविजेचा धक्का लागून 45 वर्षीय व्यक्तीचा खांबावरच  मृत्यूशॉर्ट सर्किटमुळे चिक्कोडीत कपड्यांचे दुकान भस्मसातएसआयआर अभियान यशस्वी करा : सुभाष पाटीलजिन्यावरून खाली पडून 2 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू