LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान द्यावे : विद्याभारती जिल्हा शैक्षणिक संमेलनात कुलगुरू त्यागराज यांचे प्रतिपादन

बेळगाव : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देऊन त्यांची उत्तम जडणघडण करावी, असे विचार राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू त्यागराज यांनी मांडले.
अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात बेळगाव जिल्हा शैक्षणिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात कुलगुरू त्यागराज यांनी उपरोक्त विचार व्यक्त केले.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं इतकं दृढ असावं की विद्यार्थी ज्ञान मिळवण्यासाठी स्वतःहून शिक्षकाकडे आले पाहिजेत. तरच विद्यार्थ्यांची प्रगती होईल, असेही
कुलगुरू त्यागराज म्हणाले.
प्रमुख वक्ते राघवेंद्र कागवाड यांनी यावेळी बोलताना, परिसर पर्यावरण, भारतीय संस्कृती, बदलती कुटुंब पद्धती, व नागरिक शिष्टाचार याबद्दल अमूल्य विचार व्यक्त केले.
याप्रसंगी विद्याभारतीचे राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, प्रशासक राजेंद्र कुलकर्णी, जिल्हा सचिव एस एल कुलकर्णी, विज्ञान प्रमुख एस. व्ही. व्हनुले, रामनाथ नाईक, महेश नरगुंदकर उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती ओमकार, भारत माता फोटोपूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सुजाता दप्तरदार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तर प्रास्ताविक भाषण परमेश्वर हेगडे यांनी केले. त्यांनी संपूर्ण देशात सुरू असलेल्या विद्या भारतीच्या कार्याची माहिती दिली. यानंतर शिक्षकांना त्यांच्या विविध शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच विद्याभारती च्या वतीने आगामी वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती शिक्षकांना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोजा कटगेरी यांनी केले तर एस व्ही कुलकर्णी यांनी
आभार मानले.
या शैक्षणिक संमेलनाला संत मीरा अनगोळ , संत मीरा गणेशपुर, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर, हनिवेल स्कूल खानापूर, गजाननराव भातकांडे स्कुल, देवेंद्र जिंनगौडा स्कूल, रामदुर्ग येथील शिक्षक वर्ग उपस्थित होते.


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल