LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीची जोपासना करावी : शिवाजी हसनेकर

बेळगाव : विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीची जोपासना केली पाहिजेत. वाचनामुळे ज्ञानात भर पडते. ज्ञान हे एका दिवसात मिळत नाही तर त्यासाठी दैनंदिन जीवनात नित्यनेमाने वर्तमानपत्रे, चरित्रे, आत्मचरित्रे, कथा, कादंबरी याचे वाचन केले पाहिजे. यामुळे आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडी समजतात, दृष्टिकोनाचा विस्तार होतो. व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे प्रतिपादन शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजी हसनेकर यांनी केले.


राज्य मराठी विकास संस्था मुंबई आणि छत्रपती शाहू प्रकाशन मंडळाचे साप्ताहिक राष्ट्रवीर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित भगतसिंग हायस्कूल आंबेवाडी येथे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी हसनेकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शिवाजी अतिवाडकर होते. व्यासपीठावर राष्ट्रवीर साप्ताहिकचे व्यवस्थापक शंकर कंग्राळकर, शाळा सदस्य समितीचे उपाध्यक्ष शिवाजी राक्षे, मल्लाप्पा सांबरेकर, गजानन घुग्रेटकर, मलेश लोहार, लक्ष्मीबाई कोवाडकर, मुख्याध्यापक एन. के. गुरव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली. स्वागत प्रभारी मुख्याध्यापक एन. के. गुरव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख माधुरी येलूरकर यांनी केले. सूत्रसंचालन जी . जी. पाटील यांनी केले. तर आभार क्रीडा शिक्षक जे. वाय. पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सुरेश पाटील यांनी प्रयत्न केले.
निबंध स्पर्धेत विविध शाळातील 71 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाग घेतला होता.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती