LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

पीएच.डी. प्रवेशासाठी शिवमने 14 दिवसांपासून छेडलेय ठिय्या आंदोलन : म्हणतोय,' चाचणीत दुसरा येऊनही झालाय अन्याय '

वाराणसी - बनारस हिंदू विद्यापीठातील (बीएचयू) ‘शांती आणि संघर्ष अध्ययन’ विभागात पीएच.डी. प्रवेशासाठी आवश्यक चाचणीत दुसरा क्रमांक मिळवूनही पीएच.डी. प्रवेश नाकारण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवम सोनकर या दलित विद्यार्थ्याने तब्बल 14 दिवसांपासून ठिय्या आंदोलन छेडले आहे.
शिवम मागील 14 दिवसांपासून उपकुलगुरूंच्या निवासस्थासमोर बैठक मारून आहे.


शांती आणि संघर्ष अध्ययन’ विभागाने पीएच.डी.साठी सहा जागा जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये तीन जागा ज्युनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि तीन जागा प्रवेश परीक्षेद्वारे भरल्या जाणार होत्या. या प्रवेश परीक्षेत शिवमने दुसरा क्रमांक मिळवला खरा. पण, अनुसूचित जातींसाठी कोणतीही आरक्षणाची तरतूद ठेवण्यात आलेली नाही. त्या तीन जागा सामान्य व ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत,” त्यामुळे त्याला पीएचडी साठी प्रवेश देण्यात आला नाही.


, जेआरएफ श्रेणीतील तीन जागाही विभागाने भरल्या नाहीत. इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी न भरलेल्या जागा हस्तांतरित केल्या जातात, मग माझ्या बाबतीत हा न्याय का नाही?” असा सवाल करीत त्याने बनारस हिंदू विद्यापीठातीच्या उपकुलगुरूंच्या निवासस्थासमोर मागील 14 दिवसांपासून ठिय्या आंदोलन छेडले असून प्रवेश मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार त्याने केला आहे.


शिवम सोनकर याने 21 मार्च रोजी निकाल जाहीर झाल्यानंतरच आपले धरणे आंदोलन सुरू केले. एप्रिल 3 रोजी कार्यकारी कुलगुरू प्रा. संजय कुमार यांनी त्यांच्या प्रवेश अर्जाची फेरतपासणी करण्याचे आश्वासन दिले. पण, अद्याप याबाबत विचार झालेला नाही.


, “सोनकर यांनी पीएच.डी. प्रवेश परीक्षेद्वारे अर्ज केला होता. उपलब्ध दोन जागापैकी एक सामान्य व एक ओबीसी जागा आधीच भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असतानाही त्यांना प्रवेश मिळू शकला नाही.” असे विद्यापीठ प्रशासनाने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.


“शिवम सोनकर जेआरएफच्या तीन न भरलेल्या जागा नियमित प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट कराव्यात अशी मागणी करत आहेत. मात्र पीएच.डी.च्या नियमानुसार, अशा प्रकारची जागांची बदलणी शक्य नाही,” असे प्रशासनाने म्हणणे आहे. .

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम