LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सायबर गुन्हेगारी रोखण्यासंदर्भात 28 रोजी जनजागृती सभेचे आयोजन

बेळगाव : सायबर गुन्हेगारी संदर्भात जनजागृती करण्यासाठी बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटी व पोलीस आयुक्त कार्यालय यांच्यावतीने शनिवार दिनांक 28 मार्च रोजी जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.



मंगळवार पेठ टिळकवाडी येथील सामर्थ्य मंदिराच्या सभागृहात ( बालिका आदर्श विद्यालयाच्या जवळ ) सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या या जनजागृती सभेत सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी कोणती सावधानता बाळगावी यासंदर्भात बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे व सायबर गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त मंतेरो मार्गदर्शन करणार आहेत.


बेळगाव-सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत असून या गुन्हेगारांच्या कारवायांमुळे काहींच्या जीवावर बेतले आहे. यामुळेच यावर जनजागृती करणे व ज्येष्ठ नागरिकांनी कोणती सावधानता बाळगावी यासंदर्भात बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटी व पोलीस आयुक्त कार्यालय यांच्यावतीने जनजागृती आणि मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी या सभेस वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष विश्वास धुराजी तसेच विकास कलघटगी व शिवराज पाटील यांनी केले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल