LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मीनाक्षी पाटील म्हणाल्या, ' युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करावे '  

अरिहंत ग्रुपतर्फे रोजगार मेळावा 

निपाणी : स्पर्धेच्या युगात युवकांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करून स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे रोजगाराच्या संधींमध्येही  बदल होत आहेत. त्यामुळे युवकांनी संगणक ज्ञान, संवाद कौशल्य आणि आधुनिक तांत्रिक शिक्षणावर भर दिल्यास भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे मत मीनाक्षी पाटील यांनी केले. बोरगाव येथे आयोजित  रोजगार मेळाव्यात बोलत होत्या.

पाटील म्हणाल्या, निपाणी व  परिसरातील बेरोजगार युवकांन रोजगाराची संधी मिळावी, या हेतूने  सात वर्षांपासून रोजगार मेळावा भरविण्यात येत आहे. येथे केवळ पदवी देत नसून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध केल्या जात आहेत.शाळेचे अध्यक्ष उत्तम पाटील व कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांनी युवकांसाठी विविध शिबिरे रोजगार मेळाव्यांचे उपक्रम हाती घेत आहेत. अरिहंत उद्योग समूहाकडून अनेक हजारो युवकांना रोजगाराची संधी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले 
मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे विनयश्री पाटील यांनी सांगितले. 
विविध नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून युवकांना रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. मेळाव्यात सुमारे २ हजारापेक्षा अधिक बेरोजगार युवक-युवतींनी सहभाग नोंदवून विविध कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अभय करोले, संचालिका युवराज पाटील, अरिहंत संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे, महादेव उलपे, अण्णासाहेब भोजकर, कृषी संघाचे सीईओ आर. टी. चौगुला, शिक्षण संस्थेचे सीईओ बाळासाहेब हावले, औद्योगिक केंद्राचे प्राचार्य व्ही.बी.शिरहट्टी, दयानंद सदलगे, विक्रम घाटगे यांच्यासह विविध कंपन्यांचे पदाधिकारी युवक, युवती उपस्थित होत्या.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जमिनीच्या वादातून सहाजणांची गोळ्या झाडून हत्या : भर दिवसा घडला थरारविजेचा धक्का लागून चिमुरडीचा मृत्यू प्रदेशाध्यक्षपद : अंतिम निर्णय मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचाच पैशांच्या वादातून दोघांवर जीवघेणा हल्ला : तिघांविरोधात गुन्हा दाखल' त्या ' खून प्रकरणी एका अल्पवयीनासह 5 जणांना अटकमीनाक्षी पाटील म्हणाल्या, ' युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करावे '  दिवंगत स्वातंत्र्यसैनिक मारुती मगदूम कुटुंबीय न्यायापासून वंचित : निपाणीकरांची  सर्वंकष लढ्याची घोषणादिवंगत सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) यांना मरणोत्तर 'धर्मर्षी ' आणि  'जैन सेवा गौरव' समाजसेवा पुरस्कार प्रदानपालिका प्रशासनाने राबवावी स्वच्छता मोहीम : शिरगुप्पी ओढ्यातील कचऱ्यामुळे पावसाळ्यात होतोय तलावात येणाऱ्या पाण्याला अडथळा प्रमोद मुतालिक म्हणाले, ' हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी प्रत्येक हिंदूंचा सहभाग महत्त्वाचा '