LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आणि दाम्पत्यांने मागितली इच्छामरणाची परवानगी 

कित्तूर : कित्तूर नगरपंचायतीच्या सदस्यांनी व कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक घरातील पिण्याच्या पाण्याचा नळजोडणी तोडल्याचा आरोप करत एका दाम्पत्याने तहसीलदारांकडे थेट इच्छामरणाची परवानगी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कित्तूर येथील रहिवासी मंजुनाथ सवदी आणि त्यांची पत्नी श्रुती मंजुनाथ सवदी यांनी 3 जुलै रोजी तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे
निवेदनात मंजुनाथ सवदी यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून नगरपंचायतीचे सदस्य आणि कर्मचारी यांनी जाणूनबुजून त्यांच्या घराची पिण्याच्या पाण्याची नळजोडणी तोडली आहे. याबाबत संबंधित सर्व अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप न्याय मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि सततच्या त्रासामुळे जगण्याची आशाच उरलेली नाही. या प्रकारामुळे मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत असून कुटुंबाचे जीवन विस्कळीत झाल्याचे दाम्पत्याने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
“आमच्या कुटुंबावर होत असलेला अन्याय थांबविणे शक्य नसेल, तर भारतीय संविधानानुसार आम्हाला इच्छामरण किंवा दयामरण सत्याग्रह करण्याची परवानगी द्यावी,” अशी मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
६ जुलैपासून आंदोलनाचा इशारा
पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर तातडीने तोडगा न काढल्यास सोमवार, ६ जुलैपासून नगरपंचायत कार्यालयासमोर इच्छामरण अथवा दयामरण सत्याग्रह सुरू करण्याचा इशारा दाम्पत्याने दिला आहे.
मूलभूत सुविधा असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर दाम्पत्याने घेतलेल्या या भूमिकेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरलमुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली :  सुदैवाने बचावले सात जणांचे प्राणआणि दाम्पत्यांने मागितली इच्छामरणाची परवानगी शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती