LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

उद्या 19 पासून बाळगोपाळतर्फे एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला : व्याख्यान मालेचा सदुपयोग करून घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

बेळगाव : दहावी परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे . या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेचे योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची ही अडचण ओळखून बाळगोपाळ एस एस एल सी , व्याख्यान मालेचे आयोजन केले गेले आहे.



रविवार दि .19 जानेवारी रोजी सकाळी 9 -30 वाजता व्ही एस पाटील हायस्कूल मच्छे येथे या व्याख्यान मालेचे उद्घाटन होणार असून ही व्याख्यानमाला दि .16 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.
प्रत्येक रविवारी एका विषयावर तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.


दिनांक 19 जानेवारी रोजी प्रथम भाषा मराठी या विषयावर लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे शिक्षक शिवाजी हसनेकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक 25 रोजी गौंडवाड हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे शिक्षक सुनील लाड हे इंग्रजी या विषयाचे मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सरदार हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले हे समाज शास्त्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक 9 फेब्रुवारी रोजी माध्यमिक विद्यालय कर्ले चे शिक्षक गजानन तांगणकर हे विज्ञान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक 16 फेब्रुवारी हा व्याख्यान मालेचा शेवटचा दिवस असून मालिकेतील या शेवटच्या दिवशी निपाणी येथील जोतिबा पाटील हे गणित या विषयाचे मार्गदर्शन करणार आहेत.



ही व्याख्यानमाला प्रत्येक रविवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत होणार असून ही.व्याख्यानमाला सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निशुल्क आहे. मच्छे,पिरणवाडी ,खादरवाडी ,संतीबस्तवावड, वाघवडे,रणकुंडये , किणये, कर्ले आणि परिसरातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी या व्याख्यान मालेचा उपयोग करून घेऊन दहावीच्या वार्षिक परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे , असे आवाहन मराठी भाषा प्रेरणा मंचचे अध्यक्ष व बाळगोपाळ कंपनीचे संचालक प्रा .डॉ .गोपाळ पाटील यांनी केले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम