LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

जीएसएस कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा 28 डिसेंबर रोजी

बेळगाव ः जीएसएस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे 28 डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या खुल्या रंगमंचावर ' सक्सेरियन्स 24 रीकनेक्ट अँड रीजॉईस ' हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित केला आहे.
या महा मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व ज्येष्ठ कलाकार प्रसाद पंडित, माजी विद्यार्थी व खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून समारंभाचे अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी व एस के ई सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत.



या महामेळाव्यासाठी ऑनलाइन नावनोंदणी करण्याची अखेरची मुदत 25 डिसेंबर ही आहे. या महामेळाव्यात महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचपासूनचे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 800 हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून हा ओघ सुरुच आहे.
महामेळावा समिती सोहळ्याचे नियोजन करत असून विविध माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. महामेळावा अविस्मरणीय व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी विविध समित्या स्थापन करून जबाबदाऱ्या पार पाडल्या जात आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी केली जात असून अधिकाधिक विद्यार्थी त्यात सहभाग नोंदवत आहेत. 28 रोजी नोंदणी करणाऱ्यांना एक हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे.
बेळगावबाहेर राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनाही महामेळाव्यात सहभागी होता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अधिक माहितीसाठी [email protected] या ईमेलवर किंवा 9844922496 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समितीने केले आहे. जी एस एस चे विद्यमान प्राचार्य अरविंद हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. भरत तोपिनकट्टी, उपाध्यक्ष अनंत लाड, सचिव प्रा. संदीप देशपांडे, महामेळावा समितीचे अध्यक्ष कुलदीप हंगिरगेकर, प्रा. अभय सामंत, महामेळावा समितीचे सचिव प्रा. अनिल खांडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


28 डिसेंबर रोजी होणारे दिवसभरातील कार्यक्रम पुढील प्रमाणे-
- सकाळी 10 ते 11 ः नोंदणी
- सकाळी 11 ते 12 ः उद्धाटन व सन्मान सोहळा
- दुपारी 12 ते 2.30 ः पुनर्मिलन व जुन्या आठवणींना उजाळा
- दुपारी 2.30 ते 3.30 ः स्नेहभोजन व समूह छायाचित्र
- दुपारी 3.30 नंतर ः सांस्कृतिक कार्यक्रम


--------------------------

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल