LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कॅपिटल वन आयोजित एसएसएलसी व्याख्यानमालेची सांगता

बेळगाव : कॅपिटल वन या पतसंस्थेने अर्थकरणावर आपली पकड मजबूत करीत गेली अनेक वर्षे सातत्याने शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपला कार्याचा ठसा उमटविला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे माजी नगरसेवक नेताजी जाधव म्हणाले.
कॅपिटल वन आयोजित एस एस एल सी व्याख्यानमाला शिबीर सांगता समारंभात नेताजी जाधव यांनी उपरोक्त विचार मांडले.
गेली 18 वर्षे संस्थेने एस. एस. एल. सी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यशस्वीरित्या एस एस एल सी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. आजवर हजारो विद्यार्थ्यांनी सदर शिबिराचा लाभ घेतला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन व त्यांच्यात परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आत्म विश्वास प्राप्त होताना दिसत आहे असेही नेताजी जाधव म्हणाले.



ज्योती कॉलेजच्या सभागृहात आयोजित एस एस एल सी सांगता समारंभ सोहळ्याला संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे व विज्ञान विषयाचे शिक्षक एस व्ही भातकांडे, सविता पवार व शिवाजीराव अतिवाडकर उपास्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली.
चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी प्रास्ताविक व स्वागत करून गेली सतरा वर्षे सातत्याने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत शाळा व विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. वेगवेगळ्या तज्ज्ञ शिक्षकांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना बराच उपयोग होत असून परीकक्षेला निर्भिडपणे सामोरे जाण्याचे धाडस देखील निर्माण होत आहे असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी मागील वर्षांमधील शिबिरामधून विषयावर उच्चांकी गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसोबत शिबीरामधून सरासरी गुणवता प्राप्त विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.


यंदाच्या शिबिरामधून शिबिर्थीनी देखील आपले मनोगत व्यक्त करून उपक्रमाबद्दल व्यक्त करून सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वश्री युवराज पाटील, एस. व्ही. भातकांडे, वसंत पाटील, सी. आय. पाटील, संजीव कोष्टी, संध्या सुतकट्टी, जोतीबा पाटील, पी. आर. पाटील, एम. व्ही. भोसले, सुनील लाड यांनी मोलाचे सहकार्य.
यावेळी संस्थेचे संचालक रामकुमार जोशी, शरद पाटील, संजय चौगुले, भाग्यश्री लक्ष्मीकांत जाधव, शाम सुतार, सेक्रेटरी स्नेहल कंग्राळकर, कर्मचारी वर्ग, पिग्मी कलेक्टर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम.व्ही. भातकांडे यांनी केले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती