LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

संत मीरा शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला.
शाळेच्या माधव सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य भारतीच्या उपाध्यक्षा हेमा आंबेवाडीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी, शिवकुमार सुतार उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, ओमकार, भारतमाता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मानवी रेवणकर व अवनी पावसकर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले,
शालेय विद्यार्थी सहाना हिने योगाचे महत्त्व सांगितले. योगागीत श्राव्या भट्ट तर भगवतगीता इंद्रजीत अमोल कुडची यांने सादर केली. योग शिक्षिका हेमा आंबेवाडीकर यांनी योगाचे महत्त्व सांगून विद्यार्थी पवन मठद व श्रीनिधी सुतार यांच्यासमवेत सूर्यनमस्कार योगाची प्रात्यक्षिके सादर करून मुलांकडून करवून घेतली.
याप्रसंगी श्रद्धा मेंडके ,धनश्री सावंत, मोनाली काळे, किरण पावसकर, गायत्री शेंद्रे, रूपा कुमठाकर, रूपाली जोशी, सुजाता पाटील, पौर्णिमा, प्रेमा मेलीनमनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानवी रेवणकर हिने केले तर चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल