LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सावध राहा आणि आर्थिक नुकसान टाळा : पोलीस आयुक्तांचे ज्येष्ठांना आवाहन

बेळगाव : सावध राहा आणि आर्थिक नुकसान टाळा असा निर्वाणीचा सल्ला पोलीस आयुक्तांनी ज्येष्ठांना दिला आहे.
बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक (जेष्ठ नागरिक) संघ' आणि 'बेळगाव शहर सायबर क्राईम विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सामर्थ्य मंदिर हॉल, टिळकवाडी येथे सायबर क्राईम जनजागृती' सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना पोलीस आयुक्तांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना हा सल्ला दिला.


ज्येष्ठ नागरिकांनी सावध राहून आपली ऑनलाईन फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळावे," असेही बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले.


पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीचे विविध प्रकार, जसे की ओटीपी फ्रॉड, 'डिजिटल अरेस्ट'ची भीती, लॉटरी स्कॅम आणि बनावट केवायसी अपडेट्स याबद्दल अत्यंत सोप्या भाषेत माहिती पोलीस आयुक्तांनी संगणकाद्वारे माहिती दिली. त्यांनी सुरक्षिततेचे नियम सांगताना संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले. तसेच, पीएसआय सुमन पवार यांनीही तांत्रिक सुरक्षिततेबाबत 'की-नोट' ॲड्रेस सादर करून ज्येष्ठांना मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाची सुरुवात मानद सचिव सुरेंद्र देसाई यांच्या स्वागतपर भाषणाने झाली, तर एसीपी (सायबर क्राईम) मंतूर यांनी प्रास्ताविक केले. संघाचे अध्यक्ष विश्वास धुराजी यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. यावेळी संदीप देसाई यांनी पोलीस आयुक्तांचा विशेष सन्मान केला. एसीपी (सायबर क्राईम) श्री. मंतूर, सायबर क्राईम पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी आणि टिळकवाडी पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी याप्रसंगी उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विकास कलघटगी यांनी केले. संघाचे अध्यक्ष विश्वास धुराजी यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत केले. पोलीस आयुक्तांनी ज्येष्ठांच्या शंकांचे पूर्णपणे निरसन केले. मानद सह-सचिव शिवराज पाटील यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती