LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

ब्रह्मलिंग हायस्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम

बेळगाव : सुळगा-हिंडलगा येथील शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित ब्रह्मलिंग हायस्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा आणि पारितोषिक वितरण असा संयुक्त सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष देवाप्पा ठाणू पाटील होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष भाऊराव आण्णाप्पा गडकरी होते.



प्रारंभी मुख्याद्यापक आर. ए. गुगवाड यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवराच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. मुख्याध्यापकांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहशिक्षिका श्रीमती एम एम बिर्जे यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.


शाळेचा यावर्षीचा आदर्श विद्यार्थी प्रथमेश नागेश जाधव व आदर्श विद्यार्थीनी कु. रुपाली अनिल कदम यांचा देवाप्पा ठाणू पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शाळेचे सहशिक्षक एन के चौगुले, संस्थेचे उपाध्यक्ष भाऊराव आण्णाप्पा गडकरी,संस्थाध्यक्ष देवाप्पा ठाणू पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती व्ही.सी. अनगोळकर व बी. एम. पाटील यांनी केले. श्रीमती टी डी गवई यांनी उपस्थिताचे आभार मांडले. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने समारंभाची सांगता झाली.
याप्रसंगी सेक्रेटरी बी.डी. पाटील, ज्येष्ठ संचालक कृष्णा ओमाण्णा पाटील, प्रकाश महादेव पाटील, प्रकाश लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम