अथणी : कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला.
अथणी तालुक्यातील मदभावीनजिक ही घटना घडली आहे.
राहुल दोडमणी (वय 26, रा. बल्लिगेरी, तालुका :अथणी) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
राहुल दोडमणी हा आपल्या एमएच 14 एव्ही 4067 क्रमांकाच्या मारुती 800 कारगाडीने नातेवाईकांच्या भेटीसाठी महाराष्ट्रात गेला होता. नातेवाईकांना भेटून परत येत असताना अथणी तालुक्यातील मदभावीनजिकच्या रस्त्यावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याची कार पलटी झाली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, या प्रकरणी अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
#accident
#athani
#youthdied
#bn7news