LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

जागतिक दर्जाचा 5  कोटींचा जलतरण तलाव दुरवस्थेत ...!

बेळगाव : हनुमान नगर येथील बॉक्साइट रोडलगतच्या उद्यानात उभारण्यात आलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव सध्या दुरवस्थेला सामोरा जात असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

महानगरपालिकेने 2019 साली सुमारे 5 कोटी रुपये खर्चून ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय मापदंडांनुसार हा जलतरण तलाव उभारला होता. मात्र, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या देखभाल आणि वापराकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
सध्या हा जलतरण तलाव एखाद्या बेवारस तलावासारखा दिसत आहे. योग्य देखभालीअभावी तलावात पावसाचे पाणी साचले असून डासांची पैदास वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून तलावाची अवस्था अत्यंत खराब झाली असून परिसरात झुडपे आणि गवत वाढले आहे. त्यामुळे येथे गैरप्रकार घडण्याचाही धोका निर्माण झाला आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांसह हा प्रकल्प उभारण्यात आला होता. 50x100 मीटर मोजमापाचा जलतरण तलाव, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम, भूमिगत पाणीसाठा (यूजी टँक), पंपिंग हाऊस आणि फिल्टर युनिट यांचा समावेश आहे. मात्र, या सर्व सुविधा आज मोडकळीस आल्याचे चित्र दिसत आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पाचा नागरिकांना कोणताही लाभ होत नसल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जन्मदिनीच काळाने घातला घाला : अपघातात झाला तरुणाचा मृत्यूपैशासाठी जन्म दिलेल्या पोराने जन्मदात्या आईला काढले घराबाहेर ...!नणंदेने रचला वहिनीच्या खुनाचा कट : नातेवाईकांकरवी करविला खून आणि रचला दरोड्याचा बनाव : चाणाक्ष पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्याआयपीएल फायनलच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त बोरसे यांनी केल्या आहेत सूचना : सार्वजनिक ठिकाणी जल्लोषास मनाई सतीश जारकीहोळी समर्थकांचे गणेशाला साकडे ...!  मंत्रीपदासह केपीसीसी अध्यक्षपद मिळावे यासाठी केली श्री गणेशाची  विशेष पूजा ..!!गोव्यातील वाहतूक दंडांबाबत दिलासा देण्याची मागणी : माजी आमदार अनिल बेनके यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनउपमुख्यमंत्री पदाबाबतचा  प्रस्ताव अद्याप आलेला नाही :  3 जूनच्या बैठकीत अंतिम निर्णय : मल्लिकार्जुन खर्गे यांची माहितीनिपाणीत सोमवारपासून बियाणांचे वाटप  एकरी 30 किलो सोयाबीन ; मूग, उडीदही उपलब्ध शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने पीडिओंची कान उघाडणी : जागतिक दर्जाचा 5  कोटींचा जलतरण तलाव दुरवस्थेत ...!