LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आनंदनगर वडगाव येथे पेव्हर्स बसविण्याच्या कामाला प्रारंभ

बेळगाव ( bn7 news) : आनंदनगर वडगाव येथे पेव्हर्स बसविण्याच्या कामाला बुधवारी भागाच्या नगरसेविका सारिका पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.



आनंद नगर दुसरा क्रॉस पासून ते तिसऱ्या क्रॉस पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर जेसीबीने खोदाई करून, त्यावर खडीकरण करण्यात आले. खडीकरण झालेल्या रस्त्यावर पेव्हर्स बसवण्याचे काम आता सुरू झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना दुसऱ्या क्रॉस वरून तिसऱ्या क्रॉस ला जाताना हा रस्ता आता सोयीचा होणार आहे. या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय पाहून या भागाच्या नगरसेविका सारिका पाटील यांनी महानगरपालिकेकडे या रस्त्यावर पेवर्स बसवून द्यावेत यासाठी वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले व या कामाला सुरुवात झाली त्यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
आनंद नगर दुसऱ्या क्रॉस वरील दोन रस्त्यावर खडीकरण करून पेव्हर्स बसविणे, तसेच पहिल्या क्रॉस वरील एका रस्त्यावर खडीकरण करून पेव्हर्स बसवणे. यासाठी दहा लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर काम कंत्राटदार कुमार दिनीमनी हे करीत आहेत. तीनही रस्त्यावर आता पेव्हर्स बसविल्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



या कामाच्या शुभारंभ प्रसंगी नगरसेविका सारिका पाटील, कंत्राटदार कुमार दिनीमनी, अभियंते मारुती नाईक, उद्योजक श्रवणकुमार जांगिड, राजाराम निलजकर, प्रा. सी.एम. गोरल यांच्यासह स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम