LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

विश्वकर्मा उद्यानास बेलेवाडी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची भेट

निपाणी : निपाणी येथील लेटेक्स कॉलनी परिसरात पर्यावरणप्रेमी शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते नामदेव चौगुले यांनी निर्माण केलेल्या श्री. विश्वकर्मा उद्यानाला बेलेवाडी (काळम्मा) ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी भेट देऊन उद्यानाची पाहणी केली. पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेत उपस्थितांनी चौगुले यांच्या कार्याचे कौतुक केले.
नामदेव चौगुले यांनी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, मित्रांच्या वाढदिवसांच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्याची अभिनव परंपरा जपली आहे. स्वखर्चातून विविध वृक्षांची लागवड करून त्यांनी उभारलेले श्री.विश्वकर्मा उद्यान आज पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. वृक्षसंवर्धन, जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षण याविषयीचे त्यांचे ज्ञान व प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त होणारी निसर्गनिष्ठ भूमिका सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच बजरंग कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील, मुख्याध्यापक आर. के. पाटील, आनंदराव पाटील प्रशाला बेलेवाडी (काळम्मा), तसेच सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष टी. एस. गडकरी उपस्थित होते.
उद्यानातील विविध औषधी, फुलझाडे व पर्यावरणपूरक संकल्पनांची माहिती नामदेव चौगुले यांनी पाहुण्यांना दिली. ग्रामीण भागात अशा प्रकारचे उपक्रम अधिक प्रमाणात राबविण्याची गरज असून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल