LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय पूर्व बैठक उत्साहात

बेळगाव ( bn7 news) : अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात बेळगाव जिल्हा विद्याभारती पूर्व बैठक उत्साहात पार पडली.
बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून विद्याभारती राज्य अध्यक्ष परमेश्वर हेगडे, उमेश कुमार, सहसचिव सुजाता दप्तरदार, विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर , खजिनदार रामनाथ नाईक संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी विद्याभारती जिल्हा सचिव एस व्ही कुलकर्णी, अमरनाथ जी उपस्थित होते,



प्रारंभी सरोजा कटगेरी यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले, यानंतर पाहुण्यांचे हस्ते सरस्वती भारतमाता, ओमकार फोटो पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
या बैठकीत आगामी होणाऱ्या शैक्षणिक वर्षातील विद्याभारतीच्या विविध उपक्रमाची माहिती देण्यात आली .तसेच संत मीरा इंग्रजी शाळा अनगोळ येथे 24 एप्रिल ते 4 मे दरम्यान होणाऱ्या शिशु शिक्षक शिबिराबाबत चर्चा करण्यात आली. यात होणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनी दिली व सर्व विद्याभारती संलग्नित शाळेने यात उत्साहाने भाग घेऊन हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आवाहन केले.
तसेच आगामी होणाऱ्या विद्याभारती बेळगाव जिल्हा शैक्षणिक संमेलन शनिवार तारीख 28 जून रोजी स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर तसेच 12 जुलै रोजी विविध विषयाची कार्यशाळा देवेंद्र जिंनगौडा शाळेत तसेच ऑगस्टमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा शांतिनिकेतन स्कूल खानापूर तर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संत मीरा गणेशपुर शाळेत योगा, बुद्धिबळ ,कबड्डी, मलखांब, कराटे, संत मीरा अनगोळ शाळेत अथलेटिक्स, फुटबॉल ,हँडबॉल, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर शाळेत हॉलीबॉल, थ्रोबॉल, खो खो अशा स्पर्धा घेण्याचा निर्णय झाला.


या बैठकीला शांतीनिकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वाळवे, विजयालक्ष्मी पाटील, श्रद्धा पाटील, आरती पाटील, विद्याभारती शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील प्रेमा मेलिनमनी विना जोशी, प्रीती कोलकार व विविध शाळेचे शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, ' नवरात्रोत्सव आणि दसरा हा समाजात एकता, परस्पर प्रेम, बंधुत्व आणि सलोखा वाढवणारा सण '' गुरुः साक्षात् परब्रह्म ' या आध्यात्मिक सोहळ्याचे आज बेळगावात आयोजनबेळगाव उत्तरच्या आमदारांचा जनता दरबार : नागरी समस्यांचे निवारण करण्याची दिली ग्वाही कुमारस्वामी म्हणताहेत, ' 2028 ला राज्यात आघाडीचे सरकार 'लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी घेतले तरुणाला ताब्यात ..!श्री रेणुकादेवी महिला मंडळा 'कडून ' एसटीएम ' च्या आई भवानी देवीला ' अर्पण करण्यात आली मानाची साडी-चोळीजिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडती