LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

वेंकटेश प्रसाद उद्या बेळगावात ..!

बेळगाव : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad)  हे उद्या शनिवार दिनांक  13 जून रोजी बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत.

 सकाळी 10.30 वाजता सत्यात्मतीर्थ शिक्षण संस्थेतर्फे बी.के. मॉडेल कॉलेज परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे धर्मदर्शी व्ही. एन. पाटील राहणार आहेत. तसेच बी.ई. सोसायटीचे अध्यक्ष अविनाश पोतदार, एसईएस सोसायटीचे अध्यक्ष विलास जोशी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन ( Mohammed Roshan),  पदवीपूर्व शिक्षण विभागाचे उपसंचालक कांबळे यांच्यासह संस्थेचे धर्मदर्शी, मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST