LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

वेदांत हलगेकर, विराज हलगेकर यांचे कराटे स्पर्धेत यश

वेदांत हलगेकर, विराज हलगेकर यांचे कराटे स्पर्धेत यश


बेळगांव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे कराटेपटू विराज विनायक हलगेकर व वेदांत विनायक हलगेकर यांनी राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
म्हापसा-गोवा येथे शोटोकान कराटे डु संघटनेच्या मान्यतेने नुकत्याच झालेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत 8 वर्षाखालील मुलांच्या गटात वेदांत हलगेकरने कटाज व सुवर्ण व फाईटमध्ये रौप्यपदक तर 10 वर्षाखालील मुलांच्या गटात विराज विनायक हलगेकर यांनी कटाज व फाईट या दोन्ही प्रकारात 2 सुवर्णपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
तसेच नुकत्याच उडपी येथे उडपी बुडोकान स्पोर्ट्स कराटे कर्नाटक आयोजित कराटे स्पर्धेत वेदांतने कटाज व फाईटमध्ये 2 सुवर्ण तर विराज हलगेकरने कटाज फाईटमध्ये 2 सुवर्णपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या कराटेपटूंना कराटे प्रशिक्षक आकाश बडगेर यांचे मार्गदर्शन तर शाळेच्या क्रीडा शिक्षिका अनुराधा पुरी मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, पालक विनायक हलगेकर व आई सुलभा यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल