LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रम : सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन

 बेळगाव-  कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रम सुरू असून  सीमाभागातील विद्यार्थ्यांना माफक शुल्कात  उच्च शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रमात देण्यात येणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन  उपकुलसचिव विनय शिंदे यांनी केले आहे.

   शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी म.ए.समितीतर्फे सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ओरिएंटल हायस्कूल येथील तुकाराम तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे केले होते.     
यावेळी व्यासपीठावर  म.म.ए.समितीचे अध्यक्ष  प्रकाश मरगाळे, शिवाजी विद्यापीठातील समन्वयक डॉ. सचिन भोसले, डॉ. नगिना माळी  व मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील होते. 
    डॉ. भोसले व डॉ. माळी यांनी विविध अभ्यासक्रम, सर्टिफिकेट कोर्सेस, अभ्यास केंद्राची माहिती, शैक्षणिक आणि करिअर विकासाच्या संधी याबद्दल माहिती दिली. तसेच पदवी घेवू इच्छिणारे युवक-युवती स्पर्धा परिक्षेचे अभ्यासार्थी, सैनिक, नोकरदार, गृहिणी, उद्योजक, शेतकरी, कामगार  या सर्वांच्यासाठी दूरशिक्षणाची माहिती सांगितली. 
   यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना विनय शिंदे व डॉ. सचिन भोसले  यांनी उत्तरे दिली.
  यावेळी  अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, महेश जुवेकर, सुहास हुद्दार यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
चालकाचा ताबा सुटल्याने कार खड्यात पडून झाली पलटी : दोघांचा मृत्यू तर दोघे जखमी‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून बेळगावात साकारले जाणार भव्य हॉकी मैदान :  'हॉकी बेळगाव' संघटनेकडून केले जात आहेत प्रयत्न21 दिवसांत 3.72 कोटी रुपयांचे दान ...! दान म्हणून आलेय 67 ग्रॅम सोने आणि 511 ग्रॅम चांदी ....!!डीआयजी एम. एन. अनुचेत यांनी स्वीकारला वार्ता व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रम : सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहनराज्यस्तरीय शेतकरी संघटनांची बैठक पार : वीज महामंडळाच्या खासगीकरण प्रस्तावावर केली गेली चर्चा बेळगावात आधार सेवा केंद्राचे उद्घाटन : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटनकेपीसीसी अध्यक्षांनी मोदी आणि शाहांवर केलाय आरोपांचा भडिमार : म्हणाले, ' राम मंदिर निधी आणि संबंधित व्यवहारांची पारदर्शक चौकशी व्हावी 'ईडी घेत आहे दुसऱ्या दिवशीही झाडाझडती : पहाटे मारला निवासस्थानी छापा' ही कोल्हेकुई वेळीच थांबवा अन्यथा .....'  : येळ्ळूर म.ए. समितीने दिला ईशारा