LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

नियोजनशून्य नगरपालिका : जलवाहिन्यांना गळत्या:  लोकांची पाण्यासाठी होतेय वणवण 

निपाणी : नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभारामुळे निपाणी शहराची पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली आहे. ठिकठिकाणी जलवाहिनीला लागलेल्या गळत्यामुळे  अकारण पाणी वाहून जात असून ही बाब पाणीपुरवठा विभाग गांभीर्याने घेताना दिसत नाही. 
निपाणी शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, शहरांतर्गत येणारे अनेक भाग मूलभूत सुविधांपासूनच वंचित आहेत.  ऐन उन्हाळ्यात जलवाहिन्यांना गळती लागत आहे. चारच दिवसांनी बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीची दुरुस्ती केली होती. पण आता पुन्हा गळती लागल्याने नागरिकांना कुठे सहा ‌ दिवस तर कुठे सात दिवसाला नळाचे पाणी मिळत आहे. त्यामुळे शहर विस्तारूनही येथील पाणी प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. निवडणुका आल्यावरच राजकीय मंडळींना पाणी समस्या आठवत असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.
जवाहर तलावातील पाण्यानेही तळ गाठला असून सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका अपयशी ठरली आहे. ऐन उन्हाळ्यात कुपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. जलवाहिन्यांना वारंवार गळत्या लागत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पाणी विकत घेण्याचा भुर्दंड बसत आहे.
उपनगरातही अनेक ठिकाणी जलवाहिन्या जमिनीत घालून नळ जोडण्यात आले आहेत. पण पाण्याचा दाब कमी असल्याने नागरिकांना पाणी विकत आणावे लागत आहेत.
काही प्रभागात नळांना सतत पाणी असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा गैरवापर होत असून पाणी वाया जात आहे. त्याकडे मात्र नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. 
----
'शहर आणि उपनगरात पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाइन टाकली आहे . पण काही ठिकाणी पाणीच येत नाही. आलेच तर रात्री नागरिकांना जागरण करून पाणी भरावे लागत आहे. हॉल्वच्या ठिकाणी गटारी असल्याने सांडपाणी नळामधून पुरवठा होत आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे. शिवाय जलवाहिन्यांना लागलेल्या गळत्य  व्यवस्थित काढणे आवश्यक आहे.'
-मज्जिद सय्यद, 
माजी नगरसेवक, निपाणी
---

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बालवीर विद्यानिकेतनमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागतकरंबळ ग्रामपंचायत पिडीओंच्या निलंबनाची होतेय मागणी ..!शिंदोगी फाट्यावर शेतकऱ्यांचा अहोरात्र एल्गार : आमदार वैद्य म्हणाले, ' सायफन दुरुस्ती लवकरच पूर्ण केली जाईल 'मुदतीत विशेष मतदार यादी पुनरावलोकन पूर्ण करा : आयुक्त कार्तिक एम यांची सूचनाजीआरबीसी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी : आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदनटिळकवाडी पोलिसांनी घातक शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला घेतले ताब्यात बेळगावच्या स्केटिंगपटूंनी दिला ' झाडे लावा, झाडे जगवा ' चा  संदेशराज्य सरकारने केला विद्यार्थ्यांना गणवेशात बदल : यंदा मिळणार सुतिमिश्रित कापड स्वर्गीय सुरेश अंगडी यांच्या जन्मदिनानिमित्त गणेश मंदिरात करण्यात आली प्रार्थनानियोजनशून्य नगरपालिका : जलवाहिन्यांना गळत्या:  लोकांची पाण्यासाठी होतेय वणवण