LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

युवकांचा वाढतोय आत्महत्येकडे कल : क्षुल्लक कारणासाठी केली आत्महत्या

बेळगाव ( bn7 news) : युवकांचा आत्महत्येकडे कल वाढत चालल्याचे दिसत आहे. क्षुल्लक कारणावरून बेळगावमधील न्यू वैभव नगर येथे एका 24 वर्षीय तरुणाने स्वतःला संपविले.
ही गंभीर बाब असून समाजात याबद्दल समाजात प्रबोधन होणे गरजेचे आहे.


इतका महागडा आयफोन का घेतलास असे वडिलांनी विचारल्याने मुस्तफीस अब्दुल रशीद शेख नामक तरुणाने स्वतःला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.


मुस्तफीस हप्त्यांवर (ईएमआय) 70 हजार रुपयांचा आयफोन खरेदी केला होता. आपला मोबाईलचा मोठा हप्ता कसा भरेल या चिंतेने वडिलांनी, इतका महागडा आयफोन का घेतलास असा प्रश्न मुलाला केला आणि या गोष्टीमुळे मन दुखावलेल्या तरुणाने घरातल्या खोलीत गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.

छोट्या छोट्या गोष्टीतून आज मुलांचा इगो दुखावू लागला आहे. मुलांची मानसिक शक्ती कमजोर होत असून निराशेने ग्रासलेले तरुण आव्हानांचा, समस्यांचा, दुःखाचा सामना न करता आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत, ही गंभीर बाब आहे. यावर समाजात चिंतन होणे गरजेचे असून शाळा-महाविद्यालयातून विद्यार्थ्यांचे आणि समाजातील विचारवंतांकडून तरुणांचे मनोधैर्य वाढविण्याच्या अनुषंगाने प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे ठरत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम