LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सिद्धरामय्या यांच्या आरोपमुक्तीच्या प्रार्थनेसाठी समर्थकाने घातला तब्बल 10 कि. मी. अंतराचा दंडवत

बागलकोट : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी ( मुडा ) प्रकरणात अडकले असून या प्रकरणातून ते आरोपमुक्त व्हावेत यासाठी त्यांच्या एका निष्ठावंत समर्थकाने दंडवत घालत तब्बल 10 कि. मी. अंतर पार केले. सिद्धरामय्या हे मुडा प्रकरणातून आरोपमुक्त व्हावेत अशी प्रार्थना दंडवत घालताना त्याने परमेश्वराकडे केली.


श्रीशैल वालीकर असे सिद्धरामय्या समर्थकाचे नाव असून तो विजापूर जिल्ह्यातील यरनाळ गावचा रहिवासी आहे.
श्रीशैल वालीकर याने बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील संगम क्रॉस पासून कूडलसंगम पर्यंत हा 10 किमी अंतराचा दीर्घ दंडवत घातला. हा प्रवास करताना त्यांनी प्रत्येक पावलागणिक सिद्धरामय्या यांना मुडा प्रकरणातून मुक्त कर, अशी प्रार्थना केली परमेश्वराकडे केली.


कूडलसंगमला पोहोचल्यावर बसवण्णांच्या ऐक्यमंटप आणि संगमनाथ मंदिरात त्याने विशेष पूजा केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्यां यांचे कल्याण कर, आणि त्यांच्यावरील मुडा प्रकरणातील सर्व आरोप दूर व्हावेत, अशी प्रार्थना त्याने देवाकडे केली.
हे दंडवत कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती