LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगावच्या स्केटिंगपटूंनी दिला ' झाडे लावा, झाडे जगवा ' चा  संदेश

बेळगाव बेळगावच्या स्केटिंगपटूंनी स्केटिंग रॅली काढून '' झाडे लावा, झाडे जगवा ' चा  संदेश दिला. नगरसेवक नितीन जाधव यांनी या जागृती रॅलीला चालना दिली. 

गोवावेस स्विमिंग पूल परिसरातून  रॅलीला सुरुवात झाली. स्केटिंग पटूंनी स्केटिंग करीत झाडे लावा झाडे जगवा अशी जनजागृती करत लोकांना आवाहन केले. 
रॅली मध्ये प्राणिका मोटेकर, कुलदीप बिर्जे, प्रांजल पाटील, सत्यम पाटील, जानवी तेंडुलकर, आशिष अंगडीकर, श्रेयस बजंत्री, आदर्श नाईक, रचित नांगरे, राजवीर कदम, प्रीतम बागेवाडी, सार्थक चव्हाण यासह अन्य स्केटिंग पटू सहभागी झाले होते.

यावेळी नगरसेवक जाधव यांनी जमलेल्या सर्वांना किमान एक तरी झाड लावून त्याची काळजी घ्यावी. यामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी मदत होईल. झाडांमुळे सावली, फुले, फळ व भरपूर प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होते. या मुळे मानवी जीवनाला खूप लाभ होतो. म्हणूनच येणाऱ्या काळात सर्वांनी झाडे लावून त्याची निगा राखावी असे आवाहन केले.
 यावेळी प्रसिद्ध चित्रकार वसंत निर्मळे, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विशाल वेसने, योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे, सोहम हिंडलगेकर, मिसेस महत, समीर महत, करुणा वाघेला, विजय नाईक, तुलसी हिंडलगेकर बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चे स्केटिंग पटू व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बालवीर विद्यानिकेतनमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागतकरंबळ ग्रामपंचायत पिडीओंच्या निलंबनाची होतेय मागणी ..!शिंदोगी फाट्यावर शेतकऱ्यांचा अहोरात्र एल्गार : आमदार वैद्य म्हणाले, ' सायफन दुरुस्ती लवकरच पूर्ण केली जाईल 'मुदतीत विशेष मतदार यादी पुनरावलोकन पूर्ण करा : आयुक्त कार्तिक एम यांची सूचनाजीआरबीसी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी : आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदनटिळकवाडी पोलिसांनी घातक शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला घेतले ताब्यात बेळगावच्या स्केटिंगपटूंनी दिला ' झाडे लावा, झाडे जगवा ' चा  संदेशराज्य सरकारने केला विद्यार्थ्यांना गणवेशात बदल : यंदा मिळणार सुतिमिश्रित कापड स्वर्गीय सुरेश अंगडी यांच्या जन्मदिनानिमित्त गणेश मंदिरात करण्यात आली प्रार्थनानियोजनशून्य नगरपालिका : जलवाहिन्यांना गळत्या:  लोकांची पाण्यासाठी होतेय वणवण