LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

प्रकाश बेळगोजी यांची निवड ही बेळगावकरांसाठी गौरवास्पद

: सन्मान सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया

बेळगाव  : संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी केली गेलेली ‘बेळगाव लाईव्ह’चे संपादक प्रकाश बेळगोजी यांची निवड ही बेळगावकरांसाठी गौरवास्पद असून बेळगावकरांचा हा एकप्रकारे सन्मानच आहे, असे उद्गार उपस्थित मान्यवरांनी, या निवडीबद्दल करण्यात आलेल्या प्रकाश बेळगोजी यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी काढले. 

 ‘बेळगाव लाईव्ह’चे संपादक प्रकाश बेळगोजी यांचा संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार आणि ‘मराठा’ या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन असा संयुक्त सोहळा विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी रणजीत चव्हाण-पाटील होते.

‘मराठा’  समाजाला योग्य दिशा दर्शवण्यासाठी अत्यंत अभ्यासपूर्ण, वास्तवावर आधारित आणि मार्गदर्शक असणाऱ्या ,  ‘मराठा’ या मार्गदर्शक पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. यानंतर प्रकाश बेळगोजी यांचा सन्मान करण्यात आला. 

यावेळी बोलताना रमाकांत कोंडुसकर यांनी समाजातील मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. केवळ विचार मांडून उपयोग नाही तर कृतीची गरज आहे, असे स्पष्ट करत मुलीबाळांच्या संरक्षणासाठी आपण कोणत्याही कायदेशीर लढ्याला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे रमाकांत कोंडुसकर म्हणाले.
बेळगोजी यांनी बेलगाम लाईव्ह च्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा आवाज शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केले असून, त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून मिळालेले संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाचे  राज्य उपाध्यक्षपद हा संपूर्ण बेळगावचा गौरव असल्याचे प्रतिपादन गुणवंत पाटील यांनी केले.
बेळगावमधील मराठा समाजासमोर व्यवसाय, रोजगार, शिक्षण आणि विवाह हे अत्यंत ज्वलंत प्रश्न आहेत. या सर्व आव्हानांवर मार्ग काढण्यासाठी समाजाने एकत्रितपणे चिंतन शिबिर आयोजित करणे काळाची गरज आहे, असे मत अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर यांनी म्हटले.
प्रकाश बेळगोजी यांनी सीमाप्रश्न आणि येथील मराठी माणसाची परिस्थिती सातत्याने मांडून सहकार्य करावे, असे आवाहन मालोजीराव अष्टेकर यांनी केले.
सत्कारमूर्ती प्रकाश बेळगोजी यांनी, सामाजिक ऋण फेडण्यासाठी अहोरात्र एक करण्याचे अभिवचन दिले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक अनंत लाड यांनी केले. 

यावेळी मध्यवर्ती मराठा समाज सुधारणा मंडळाचे प्रकाश मरगाळे, सकल मराठा समाजाचे किरण जाधव, माजी आमदार अनिल बेनके, माजी महापौर शिवाजी सुंठकर, भाजप नेते धनंजय जाधव युवराज जाधव, काँग्रेस नेते नागेश देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, युवा नेते एस. एम. बेळवटकर, आर. आय. पाटील, शरद पाटील यांच्यासह या सोहळ्याला रायगडवरून आलेले पत्रकार नरेश पाटील, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मराठा समाजाचे नेते, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST