LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आयुक्तांनी केला महानगरपालिका जनगणना अधिकाऱ्यांचा गौरव

बेळगाव : जनगणनेचे काम आठवडाभर आधी यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या महानगरपालिकेच्या जनगणना अधिकाऱ्यांचे बेळगाव महापालिका आयुक्त कार्तिक गुप्ता यांनी गुरुवारी अभिनंदन केले. यावेळी जनगणना अधिकाऱ्यांना अभिनंदनपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


महानगरपालिका कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना आयुक्त कार्तिक गुप्ता म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांना देशाच्या सीमेवर जाऊन लढण्याची संधी मिळत नसली तरी जनगणना, निवडणुका, पल्स पोलिओ आणि कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी अंतर्गत प्रशासनात सैनिकांप्रमाणे काम केले आहे. हीदेखील राष्ट्रसेवाच आहे. अनेक तांत्रिक अडचणी आणि तीव्र उष्णता असतानाही जनगणना अधिकारी, पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अल्पावधीत जनगणनेचे काम पूर्ण केले, असे त्यांनी सांगितले.
जनगणनेसाठी एकूण 1200 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच आठ ब्लॉक तयार करण्यात आले होते. 50 अधिकाऱ्यांच्या एका तुकडीला तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. सात चार्ज अधिकाऱ्यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.
महानगरपालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या उत्तम समन्वयामुळे हे काम यशस्वी झाले, असे उपआयुक्त (महसूल) डॉ. सिद्धू यांनी सांगितले.
यावेळी प्रशासन उपआयुक्त उदयकुमार तलवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम